गांधींजींची ‘पत्रकारिता’ हा इतिहासातील एक दुर्लक्षित पैलू आहे!
गांधीजींचा असा विश्वास होता की, हे लिखाण त्यांच्या जीवनाचे सार आहे. प्रत्येक वाक्य पत्रकारासाठी ब्रह्मवाक्य असते. कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती देणं अशोभनीय आहे, असे त्यांचे मत होते. गांधीजींचे वर्तमानपत्रातील लिखाण ब्रिटिश सरकारकडून दुर्लक्षित असलेल्या सामान्य जनतेचा आवाज होता. सत्याग्रह, अहिंसा आणि सत्याचा शोध घेण्यासाठी एक मिशन म्हणून गांधीजींनी जवळपास ५० वर्षे पत्रकारिता केली.......